Loading

अकलूजचा हा किल्ला सोलापुरात नीरा नदीच्या काठावर आहे. या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनगाथा प्रतिकृतींच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. त्यामुळे या किल्ल्याला ‘शिवश्रुष्टी’ असेही म्हणतात.                                           

एका शिलालेखानुसार हा किल्ला १३व्या शतकात यादव राजा सिंघन यांनी बांधला होता. नोव्हेंबर १६८८ मध्ये विजापूरमध्ये प्लेग पसरला. या महामारीमुळे मुघल छावणीतील मृतांची संख्या वाढू लागली. त्यामुळे औरंगजेबाने विजापूर सोडून अकलूज येथे तळ ठोकला. मुकर्रबखानाने छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर (रत्नागिरी) येथे पकडल्याची बातमी औरंगझेबला इथेच मिळाली तेव्हा त्याने आनंदप्रीत्यार्थ अकलूज चे नामांतर असदनगर असे केले. 13 महिने तो याच किल्ल्यात होता. या काळात अकलूज ही मुघलांची राजधानी बनली.
गडाच्या दरवाज्यासमोर येताच घोडे, हत्ती तुमचे स्वागत करतात. किल्ल्यात प्रवेश करताना एका विशाल किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि राज्याभिषेक हे दोन महान दृश्य, त्यांची शौर्यगाथा आणि गडाच्या प्रतिकृती यातून ही शिवसृष्टी ठळकपणे उमटली आहे. याशिवाय रायगड, विजयदुर्ग, सिंहगड, प्रतापगड, राजगड, सिंधुदुर्ग, शिवनेरी, देवगिरी किल्ल्यांच्या प्रतिकृतीही पाहायला मिळतात.

वेळ: 10am-6.30pm;  तिकीट: 350rs

  • akluj fort solapur