भुईकोट किल्ला …सोलापुरातील मध्य काळातील महत्वपूर्ण वास्तू म्हणजे भुईकोट किल्ला.. बहामनी सम्राट मुहम्मद शाह दुसरा, इ.स १४६३ ते १४८२ या काळात सत्तेवर होता. त्याच्या कारकिर्दीत हा किल्ला बाांधला असा अंदाज आहे. मात्र आतील कोट हिंदू राजाने १२ व्या शतकात बाांधला अशी माहिती आहे. मध्ययुगीन काळात यात ३०० इमारत अस्तित्वात होत्या. या किल्ल्यास तीन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा बाबा कादर दरवाजा, खिळ्यांचा दरवाजा, व दिल्ली दरवाजा म्हणून ओळखला जातो. शत्रूवर अग्नीबाण सोडण्यासाठी यावर जागा आहे. इथून आत गेल्यावर जागा आहे ती पहारेकऱ्यांसाठी, घोडे बाांधण्या साठी वापरली जाई.
किल्ल्याचे दुसरे महाद्वार शहर दरवाजा किंवा मधला दरवाजा. इथे हि पहारेकऱ्यांसाठी जागा होती. २ दरवाज्यातून आत गेल्यास एक प्राचीन वास्तू उध्वस्त अवस्थेत दिसते. ते जुने मल्लिकार्जुन मंदिर आहे. शिवयोगी सिद्धेश्वर यांनी मल्लिकार्जुन मंदिराची स्थापना केली. आदिलशाही आणि निजामशाही यांच्या वादात शिवभक्तांना मंदिरात जायला अवघड होऊ लागले म्हणून त्यांनी शिवलिंग काढून आताच्या बाळीवेस मध्ये मंदिर बांधले.
तिसरा दरवाजा अली दरवाजा किंवा महाकाली दरवाजा. तीसऱ्या प्रवेशद्वारावर एक इमारत होती त्यास राजवाडा म्हटले जाई. या ठिकाणी किल्लेदार राहत असावा. दुसरेबाजीराव पेशवा या किल्ल्यात २ महिने राहिले. ते इथून गेल्यावर १० मे १८१८ मध्ये तटास शिड्या लावून इंग्रज आत घुसले. १४ मे १८१८ मद्ये इंग्रजानी हा किल्ला जिंकला . एवढेच नव्हे तर भुईकोट किल्ला हा सातत्याने हुंडा म्हणून दिल्याची नोंद देखील आहे. असा हा पुरातत्व भुईकोट किल्ला आजही शहराच्या मधोमध भक्कम पणे उभा आहे.
वेळ: 9am-5pm; तिकीट: 20rs
सोलापूर जवळचे अन्य पर्यटनस्थळे-
- सिद्धेश्वर मंदिर
- कंबर तलाव
- पंढरपूर विठ्ठल मंदिर
- तुळजापूर महालक्ष्मी मंदिर
- पंढरपूर कैकाडी महाराज मठ
- हत्तरसंग कुडल
- अकलूज किल्ला (शिवसृष्टी)