Ramdara Temple, Loni- one day trip near Pune
पुणे शहरा पासून जवळ पास २६ किमी. आणि लोणी काळभोर पासून ६ किमी अंतरावर हे रामदरा मंदिर आहे. हे एक दिवसाच्या ट्रिप साठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. especially पावसाळ्यात जेव्हा सगळी कडे हिरवी चादर पसरलेली असते.
बाहेर पार्किंग साठी खूप मोठी जागा आहे. मंदिर परिसरात खूप वडाचे झाडी आहेत. इथे आल्यावर वडाच्या झाडावर चढण्याचा मोह आवरणार नाही.
थोडे पुढे चालत गेल्यावर एक मंदिर, त्याच्या तिन्ही बाजूला पाणी आणि मागे पुढे गर्द झाडी असा सुंदर view बघायला मिळतो. सोबतच वेग वेगळ्या पक्षांचा किलबिलाट….
मंदिर परिसराच्या बाहेर काही फूड स्टॉल्स व इतर काही स्टॉल्स आहेत. शनिवार रविवारी पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी असते. काही पर्यटक मंदिराच्या मागे असलेल्या रामदारा टेकडी वर ट्रेकिंग साठी येतात. तर काही पर्यटक weekend cycle ride साठी येतात. ट्रेकिंग साठी सुद्धा हे बेस्ट लोकशन आहे.
टिप्स- फॅमिली सोबत येत असाल तर private vehicle ने येऊ शकता
हडपसर आणि स्वारगेट पासून लोणी काळभोर साठी बसेस मिळतात.
हडपसर वरून 184 नंबर ची बस येते
लोणी काळभोर पासून शेअर रिक्षा मिळते
वेळ- सकाळी ७ ते सं. ५
Best place for one day monsoon trip. You can easily spend few hours here.